˙˙जय मुक्ताई ..

Monday, 7 November 2016

गीता प्रवचने अध्याय २ / ४

गीता प्रवचने अध्याय २ / ४


    स्वधर्म इतका सहज प्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे.पण अनेक प्रकारच्या मोहामुळे ते होत नाही,अथवा फार मुश्किलीने होते.आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते.स्वधर्माच्या मार्गात कांटे पसरवणाऱ्या मोहाचीं बाह्य रुपे तर असंख्य आहेत.तथापि त्यांचे विश्लेषण केले म्हणजे त्या सर्वांच्या मुळाशी जी एक मुख्य गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उथळ देहबुद्धि.मी आणि माझ्या शरीर-संबधांची माणसे एवढीच माझी व्याप्ति.ह्यांच्या बाहेरचे सर्व परके,अथवा दुश्मन,अशी भेदाची भिंत ती उभी करते,आणि मी किंवा माझे म्हणून मानलेले जे,त्यांचेहि ती शरीरच पाहते.देहबुद्धिच्या ह्या दुहेरी कोंडित सापडून आपण तऱ्हेतऱ्हेची डबकी निर्माण करू लागतो.बहुतेक सगळे ह्याच कार्यक्रमात असतात.कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी.परंतु काही झाले तरी डबकीच.ह्या शरीराच्या चामडीइतकीच त्यांची खोली.कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो,कोणी देशाभिमानाचे डबके करुण राहतो.ब्राम्हण-ब्राम्हणेतर डबकी,हिंदू-मुसलमान डबकी,एक ना दोन,अनंत डबकी.जिकडे पहाल तिकडे तीच ती.त्याशिवाय आपणास जगवतच जसे नाही.परंतु ह्याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच.हीन विचारांचे जंतु आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. क्रमश (इति विनोबा)

शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

Tuesday, 1 November 2016

गीता प्रवचने अध्याय २ / ३

गीता प्रवचने
गीता प्रवचने अध्याय २ / ३
     जीवन-सिद्धांत-१.देहाने स्वधर्माचरण
दुसऱ्या अध्यायात जीवनाचे तीन महासिद्धांत मांडले आहेत-१) आत्म्याची अमरता आणि अखंडता २)देहाची क्षुद्रता ३) स्वधर्माची अबाध्यता.
    असे हे तीन सिद्धांत आहेत.ह्यतील स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्यरूप आहे बाकीचे दोन ज्ञातव्य आहेत.स्वधर्माविषयी मी मागच्या खेपेला थोडेसे सांगितले होते.हा स्वधर्म आपणास निसर्गत:च प्राप्त होतो.स्वधर्म शोधावा लागत नाही.आपण आकाशातून पडलो व् भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही.आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता,आपले आईवडिल होते,शेजारी होते.अशा ह्या प्रवाहात आपण जन्मतो.ज्या आईबापांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मतःच मिळाला आहे.ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे.आपल्या जन्माबरोबरच स्वधर्महि जन्मतो.किंवा तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणता येईल.कारण तो आपल्या जन्माचा हेतु आहे.तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहो.स्वधर्माला कोणी पत्नीची उपमा देतात,आणि पत्नीचा संबंध ज्याप्रमाणे अविच्छेद्य मानला आहे त्याप्रमाणे स्वधर्माचा संबंध अविच्छेद्य आहे असे वर्णन करतात.मला ही उपमा गौण वाटते.मी स्वधर्माला आईची उपमा देतो.माझी आई मला ह्या जन्मात निवडावयाची उरलेली नाही.ती अगाऊचीच सिद्ध आहे.ती कशीहि असो,ती माझी टळू शकणार नाही.ही स्थिति स्वधर्माची आहे.आपणाला ह्या जगात स्वधर्माशिवाय कोणताही आश्रय नाही.स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे 'स्व'लाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे.स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो.म्हणून तो आश्रय कोणी कधीही सोडू नये,हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत ठरतो. क्रमश(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोंविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव

Friday, 28 October 2016

गीता प्रवचने अध्याय २ / २

गीता प्रवचने अध्याय २ / २
🌸🌸गीता प्रवचने🌸🌸 
अध्याय दुसरा: भाग ०२
दुसऱ्या अध्यायापासून गीतेच्या शिकवणीस आरंभ झाला आणि आरंभिच भगवान् जीवनाचे महासिद्धान्त सांगत आहेत.ज्यावर जीवन उभारावयाचे ती जीवनाची मुख्य तत्वे आधी गळी उतरली म्हणजे पुढचा मार्ग सरळ होऊन जाईल अशी ह्यात दृष्टि आहे.गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्य-बुद्धि ह्या शब्दाचा अर्थ ' 'जीवनाचे मुलभुत सिद्धांत'असा मी करत आहे.हे मूळ सिद्धांत आता आपणाला पहावयाचे आहेत.पण तत्पूर्वी ह्या सांख्य शब्दाच्या प्रसंगाने गीतेतिल पारिभाषिक शब्दांच्या अर्थाविषयी थोडासा खुलासा करुण घेणे बरे होईल.
   गीतेला जुने शास्त्रीय शब्द नविन अर्थाने वापरण्याची
सवय आहे.जुन्या शब्दावर नविन अर्थाचे कलम करणे ही विचारक्रांतीची अहिंसक प्रक्रिया आहे.व्यासांचा ह्या प्रक्रियेत हातखंडा आहे.त्यामुळे गीतेतील शब्दाना व्यापक सामर्थ्य येवून गीता ताज़ी टवटवित राहिली आणि अनेक विचारकांना त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाने आणि अनुभवाप्रमाणे अनेक अर्थ घेता आले.हे सर्व अर्थ त्या त्या भूमिकेवरून योग्य असू शकतात आणि त्यांचा विरोध करण्याची गरज न पड़ता आपण स्वतंत्र अर्थ करू शकतो अशी माझी दृष्टि आहे.
ह्या संबंधाने उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे.एकदा देव,दानवआणि मानव प्रजापतिकडे उपदेशार्थ गेले.प्रजापतिने सर्वाना 'द' हे एकच अक्षर दिले.देव म्हणाले "आम्ही देव कामी भोगांना चटावलेले.आम्हाला 'द'अक्षराने 'दमन करा' असे प्रजापतिने शिकविले. "दानव म्हणाले आम्ही दानव क्रोधी, दयेला पारखे झालेले.आम्हाला 'द'अक्षराने दया करा असे प्रजापतिने शिकविले." मानव म्हणाले "आम्ही मानव लोभी,संचयाच्या मागे लागलेले.आम्हाला 'द'अक्षराने दान करा असे प्रजापतिने शिकविले."प्रजापतिने सर्वांचे अर्थ बरोबर मानले.कारण सर्वाना स्वानुभवातुन ते लाभले होते.गीतेतिल परिभाषेचा अर्थ करताना उपनिषदातली ही गोष्ट आपण चित्तात बाळगावी.
क्रमश(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय २ / १

गीता प्रवचने अध्याय २ / १
आत्मज्ञान आणि सम्त्वबुद्धि
गीतेची परिभाषा
बंधूनो,मागच्या वेळेस आपण अर्जुनाचा विषाद-योग पाहिला.अर्जुनासारखी ऋजुता आणि हरिशरणता असली म्हणजे विषादाचाहि योग बनतो.यालाच हृदयमंथन म्हणतात.मी गीतेच्या ह्या भूमिकेला संकल्पकारांप्रमाणे अर्जुन-विषादयोग असे विशिष्ट नांव न देता विषाद-योग असे सर्वसामान्य नांव दिले आहे.कारण गीतेला केवळ एक निमित्त आहे.


पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार पुंडलीकासाठी झाला असे नाही.पुंडलीकाचे निमित्त करुण तो आम्हा जड़जीवांच्या उद्धारासाठी आज हजारो वर्षे उभा आहे हे आम्ही पाहतो.त्याप्रमाणेच गीतेची दया अर्जुनाच्या निमित्ताने झाली तरी ती आपणा सर्वांसाठी आहे.म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाला विषादयोग हे सामान्य नावच शोभते.येथून गीतेचा वृक्ष वाढत वाढत शेवटच्या अध्यायातील प्रसादयोगरूप फळाला पोचणार आहे.ईश्वराची इच्छा असेल तर आपणही ह्या प्रवासात तेथपर्यंत जाऊन पोचू.
क्रमशः(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय १ / १२

गीता प्रवचने अध्याय १ / १२
    ऋजु बुद्धीचा अधिकारी
       पुढील सर्व गीता समजून घेण्यास अर्जुनाची ही भूमिका आपल्या उपयोगी पडली म्हणून आपण तिचे आभार मानुच.त्याच्याशिवाय आणखीहि तिचा उपकार आहे.अर्जुनाच्या ह्या भूमिकेत त्याच्या मनाची ऋजुता दिसून येत आहे. 'अर्जुन' ह्या शब्दाचा अर्थच ऋजु किंवा सरळ स्वभावाचा असा आहे.त्याच्या मनात जे काही विकार आणि विचार आले ते सर्व त्याने मोकळ्या मनाने कृष्णापुढे मांडले.त्याने चित्तात काही ठेवले नाही आणि शेवटी तो कृष्णाला शरण गेला.वस्तुतः तो आधीच कृष्ण-शरण होता.कृष्णाला सारथि बनवून ज्या वेळेस त्याने आपल्या घोड्याचे लगाम त्याच्या हातात दिले,त्याच वेळी त्याने आपल्या मनोवृत्तिचेही लगाम त्याच्या हातात सोपिवण्याची तयारी केली होती.आपणही असेच करु या.अर्जुनाजवळ कृष्ण होता,


आपल्याला कृष्ण कोठुन लाभणार,असे आपण म्हणू नये.अन्तर्यामीरूपाने कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहे.जवळात जवळ तोच आहे.आपल्या हृदयातील खळमळ आपण त्याच्यापुढे मांडू आणि म्हणू, "देवा,मी तुला शरण आहे.तू माझा अनन्य गुरु आहेस.मला काय तो मार्ग दाखीव.तू दाखवशील त्याच मार्गाने मी जाईन." आपण असे करू तर तो पार्थसारथि आपलेहि सारथ्य करील.आपल्या श्रीमुखाने तो आपल्याला गीता ऐकविल आणि विजय-लाभ करुण देईल.
प्रथम अध्याय समाप्त
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय १ / ११

गीता प्रवचने अध्याय १ / ११
       ह्या सर्व विवेचनावरुन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की,गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड़ येणारा जो मोह,त्याच्या निवारणार्थ आहे.अर्जुन धर्म-संमूढ झाला होता.स्वधर्माच्या बाबतीत त्याला मोह पडला होता.ही गोष्ट कृष्णाने दिलेल्या पहिल्या ठपक्यानंतर अर्जुन स्वतःच कबूल करीत आहे.तो मोह,ते ममत्व,ती आसक्ति दूर करणे हे गीतेचे मुख्य काम.सारी गीता सांगितल्यावर भगवंतानी प्रश्न केला,अर्जुना,गेला मोह?


अर्जुन म्हणाला देवा मोह मेला,स्वधर्माचे भान झाले.अशा प्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पाहिल्यास मोह-निराकरण हेच फलित निघते.गीतेचेच नव्हे,तर महाभारताचेही हेच उद्दिष्ट आहे.व्यासानी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविन्यासाठी मी हा इतिहास-प्रदीप पेटवित आहे. क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com

Monday, 24 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / १०

गीता प्रवचने अध्याय १ / १०
     दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनही स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायकामुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल, तर ते ढोंग होईल व् जडहि जाईल. संधि सापड़ताच त्याच्या वासना जोर करतील.संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्यवृत्ति असेल तर संन्यासातहि कठिण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सांगणारीहि स्मृतिवचने तर आहेतच. पण मुख्य मुद्दा वृत्तिचा आहे. ज्याची जी खरी वृत्ति असेल तदनुसार त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ-कनिष्ठ,सोपे-कठिण, हा प्रश्न नाही. खरा विकास हवा. खरी परिणति हवी.


      पण कोणी भाविक विचारतात, "संन्यास जर युद्ध करण्याच्या धर्माहून केव्हाहि श्रेष्ठच आहे,तर भगवंतानी अर्जुनाला खरा संन्यासी कां बनिवले नाही? त्यांना काय ते अशक्य होते?"  त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण त्यात अर्जुनाचा पुरषार्थ तो काय राहिला असता? परमेश्वर मोकळीक देणारा आहे. ज्याने त्याने धडपड करावी. त्यातच गोडी आहे. लहान मुलाला स्वतः चित्र काढण्यात आनंद असतो. त्याचा हात धरलेला त्याला आवड़त नाही. शिक्षक जर मुलांना भराभर गणिते सोडवुन देवु लागला तर मुलांची बुद्धि कशी वाढणार? आईवडिलांनी,गुरूनी,सुचना द्याव्या. परमेश्वर आतून सुचना देत असतो. ह्यहून अधिक तो काही करीत नाही. देवाने कुंभाराप्रमाणे ठोकुन,पिटून किंवा थापून प्रत्येकाचे मडके तयार करण्यात काय स्वारस्य? आपण मड़की नाही. आपण चिन्मय आहोत. 

क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com