˙˙जय मुक्ताई ..

Monday, 24 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / ९

गीता प्रवचने अध्याय १ / ९
    दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते.सुर्याचा प्रकाश मला प्रिय आहे. त्या प्रकाशाने माझी वाढ होते.सूर्य मला वंदनिय आहे. पण म्हणून मी पृथ्वीवरचे वास्तव्य सोडून त्याच्याजवळ जावु पाहीन तर जळून जाईन. उलट पृथ्वीवर राहने विगुण असेल,पृथ्वी सूर्यापुढे अगदीच तुच्छ असेल,ती स्वयंप्रकाशी नसेल,तथापि जोपर्यंत सूर्याचे तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करुण घेतला पाहिजे. माशाला जर कोणी म्हणेल,पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे, दुधात रहा, तर मासा ते कबूल करील का? मासा पाण्यातच वाचेल, दुधात मरेल.


 क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव

Sunday, 23 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / ८

गीता प्रवचने अध्याय १ / ८
   गीतेचे प्रयोजन:स्वधर्मविरोधी मोहाचा निरास
           अर्जुन अहिंसेचिच काय,पण संन्यासाचीहि भाषा बोलू लागला होता. ह्या रक्तलांछित क्षात्रधर्मापेक्षा संन्यास बरा असे अर्जुन म्हणतो. पण अर्जुनाचा तो स्वधर्म होता का? ती त्याची वृत्ति होती का? अर्जुनाला संन्याशाचा वेष सहज घेता आला असता; पण संन्याशाची वृत्ति कशी घेता आली असती? संन्यासाच्या नावाने जर तो रानात जाऊन राहता तर तेथे तो हरणें मारू लागला असता. भगवान स्पष्टच म्हणाले, अर्जुना,अरे लढाई करणार नाही म्हणतोस, तो तुझा भ्रम आहे.तुझा आजपर्यंतचा बनलेला स्वभाव तुला लढायला लावल्याशिवाय राहणार नाही."
      अर्जुनाला स्वधर्म विगुण वाटू लागतो; पण स्वधर्म कितिही विगुण असला तरी त्यात राहूनच माणसाने आपला विकास करुण घेतला पाहिजे. कारण त्यात राहूनच विकास होवु शकतो. ह्यात अभिमानाचा प्रश्न नाही. हे विकासाचे सूत्र आहे. स्वधर्म मोठा म्हणून घ्यायचा नसतो आणि लहान म्हणून टाकायचा नसतो. वस्तुतः तो मोठाहि नसतो,आणि लहानहि नसतो.तो माझ्या बेताचा असतो.


 'श्रेयान् स्वधर्मो विगुणः' 
    ह्या गीतावचनातील 'धर्म' शब्दाचा अर्थ हिंदु धर्म,मुसलमानी धर्म,ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही. प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. माझ्यासमोर असलेल्या दोनशे लोकांचे दोनशे धर्म आहेत. माझाहि धर्म दहावर्षापुर्वी होता तो आज नाही. आजचा दहा वर्षानंतर टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ति पालटत जाते तसतसा पूर्विचा धर्म गळत जातो आणि नविन धर्म लाभत असतो.हट्टाने काहीच करावयाचे नसते.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई 

गीता प्रवचने अध्याय १ / ७

 गीता प्रवचने अध्याय १ / ७
       मला ह्या ठिकाणी एका न्यायाधीशाची गोष्ट आठवते. एक न्यायाधीश होता.शेकड़ो अपराध्याना त्याने फाशीची शिक्षा दिली होती. परंतु ऐके दिवशी त्याचा स्वतःचा मुलगा खुनी म्हणून त्याच्यासमोर उभा करण्यात आला. त्याच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची न्यायाधीशावर पाळी आली. पण तसे करताना तो न्यायाधीश कचरला. तो आता बुद्धिवाद बोलू लागला,

 "फाशीची शिक्षा अमानुष आहे. ती देणे मनुष्याला शोभत नाही. मनुष्याला सुधारण्याची आशा त्यामुळे नष्ट होते. खून करणाऱ्याने भावनेच्या भरात खून केला. परंतु त्याच्या डोळ्यावरचा खून उतरल्यावर त्या माणसाला गंभीरपणे उचलून फ़ासावर लटकवून मारावयाचे हे समाजाच्या माणुसकिला लाजिरवाने व् काळिमा फासणारे आहे," 
         वगैरे मुद्दे तो न्यायाधीश मांडू लागला.तो मुलगा समोर न येता तर मरेपर्यंत न्यायाधीशसाहेब खुशाल फाशीची शिक्षा देत राहिले असते. मुलाबद्दलच्या ममत्वामुळे न्यायाधीश असे बोलू लागला. ते बोलणे आतंरिक नव्हते. ते आसक्तिजन्य होते. 'हा माझा मुलगा' ह्या ममत्वातुन निर्माण झालेले ते वाड्मय होते.
      अर्जुनाची ह्या न्यायाधीशासारखी गत झाली. त्याने मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते. गेल्या महायुद्धाचे नेमके हेच परिणाम जगाने पाहिले.पण विचाराची गोष्ट इतकीच की अर्जुनाचे ते तत्वज्ञान नव्हते,तो त्याचा प्रज्ञावाद होता. कृष्ण हे जाणून होता. म्हणून त्या मुद्याची मुळीच दखल न घेता त्याने मोहनाशाचा उपाय अवलंबिला. अर्जुन जर खरोखर अहिंसावादी झालेला असता तर अवांतर ज्ञान-विज्ञाने कोणी कितीही सांगितली तरी मूळ मुद्यान्चे उत्तर मिळाल्याशिवाय त्याचे समाधान झाले नसते. पण सबंध गीतेत ह्या मुद्याचे उत्तर नाही आणि अर्जुनाचे समाधान झालेले आहे.ह्या सर्वांचा भावार्थ इतकाच की अर्जुनाची अहिंसावृत्ति नव्हती,तो युद्ध-प्रवृत्तच होता.युद्ध त्याच्या दृष्टीने त्याचे स्वभाव प्राप्त आणी अपरिहार्य ठरलेले कर्तव्य होते.ते कर्तव्य आता तो मोहाने टाळू पाहत होता. आणि गीतेची ह्या मोहावरच मुख्य गदा आहे. 
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ६

गीता प्रवचने अध्याय १ / ६

    अर्जुन रणांगणावर उभा राहिला तो कृतनिश्च्याने आणि कर्तव्यभावनेने उभा राहिला होता. क्षात्र-वृत्ति त्याच्या स्वभावात होती. युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न करुण ते टळले नव्हते. कमीत कमी मागणी व कृष्णासारख्याची मध्यस्थी दोन्ही वाया गेल्या होत्या. अशा स्थितीत देशोदेशींचे राजे जमवून आणि कृष्णाला सारथ्य प्तकरायला लावून तो रणांगणावर उभा राहतो आणि वीर-वृत्तीच्या उत्साहाने कृष्णाला म्हणतो, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेवुन उभा कर, म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत त्यांची तोंडें एकदा मी पाहून घेतो. कृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि अर्जुन सभोवार नजर फिरवितो, तो त्याला काय दिसते? दोन्ही बाजूंना आपल्याच नातेवाईकांचा,सगेसोयऱ्याचा प्रचंड मेळावा उभा आहे. आजे,बाप,मुले,नातू-आप्तसंबंधाच्या चार पीढ्या मारण-मरणाच्या अंतिम निश्च्याने एकत्र झाल्या आहेत असे त्याला दिसते. ह्या गोष्टीची कल्पना आधी त्याला नसेल असे नाही. पण प्रत्यक्ष दर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो.तो सारा स्वजनसमूह पाहून त्याच्या हृदयाची कालवाकालव सुरु होते.

    त्याला फार वाईट वाटते.  आजपर्यंत त्याने अनेक लढायांत असंख्य विरांचा संहार केला होता. त्या वेळी त्याला वाईट वाटले नाही. त्याचे गांडीव गळून पडले नाही, त्याच्या शरीराला कापरे भरले नाही, त्याचे डोळे ओले झाले नाहीत; मग आत्ताच असे का? त्याच्या ठिकाणी अशोकाप्रमाणे अहिंसावृत्तीचा उदय झाला होता? नाही ही सारी स्वजनासक्ति होती.आजच्या घटकेलाहि जर समोर गुरु,बंधु,आप्त नसते तर त्याने शत्रुंची मुंडकी चेंडुप्रमाणे उडविली असती. पण आसक्तिजन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली. आणि मग त्याला तत्वज्ञान आठवले. कर्तव्यनिष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला तरी नागडी कर्तव्यच्युति त्याला सहन होत नाही. तो तिला एखादा सद्विचार नेसवितो. अर्जुनाचे असेच झाले. तो आता युद्धच मुळात पाप आहे असे उसने प्रतिपादन करू लागला. युद्धाने कुलक्षय होईल,धर्म लोपेल,स्वैराचार माजेल,व्यभिचार-वाद पसरेल,दुर्भिक्ष ओढ़वेल,समाजावर संकटे येतील असे अनेक मुद्दे तो कृष्णालाच समजावून सांगू लागला. 
क्रमश (इति विनोबा) 
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ५

गीता प्रवचने अध्याय १ / ५

       अर्जुनाचे क्लैब्य दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली असे काही लोक म्हणतात. त्यांच्या मते गीता कर्मयोग सांगणारी आहे. एवढेच नव्हे तर ती युद्धयोग सांगणारी आहे. जरा विचार केला तर ह्या म्हणण्यातील चूक दिसून येईल. अठरा अक्षौहिणी सैन्य लढायला सिद्ध होते.अर्जुनाला सबंध गीता ऐकवून त्या सैन्याच्या लायकीचे केले असे का आपण म्हणणार? अर्जुन घाबरला.ते सैन्य घाबरले नव्हते. ते का अर्जुनाहून अधिक योग्यतेचे? ही तर कल्पनाच करवत नाही. शेकडो लढाया खेळलेला तो महावीर होता. उत्तर-गोग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म-द्रोण-कर्णाना हतबल केले होते. नेहमी विजय मिळविणारा,सर्व नरांतील एकच खरा नर अशी त्याची ख्याती होती. वीरवृत्ति त्याच्या रोमारोमात होती. अर्जुनाला डिंवचन्यासाठी क्लैब्याचा आरोप तर कृष्णानेहि करुण पाहिला. पण तो बाण वाया जाऊन पुढे वेगळ्याच मुद्यावर ज्ञान-विज्ञानांची अनेक व्याख्याने द्यावी लागली आहेत. तेव्हा क्लैब्य-निरसनाइतके सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित आहे.


   दुसरे काही म्हणतात, अर्जुनाची अहिंसा-वृत्ति दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे. माझ्या दृष्टीने हेही म्हणने बरोबर नाही. तेँ कसे,हे पाहण्यासाठी आपणाला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे. त्या कामी पाहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायात शिरलेले आखात फार उपयोगी आहे. 

क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ४

गीता प्रवचने अध्याय १ / ४
अर्जुनाच्या भूमिकेचा संबंध
    कित्येकाना वाटते,गीतेचा आरंभ दुसऱ्या अध्यायापासून धरावा. दुसऱ्या अध्यायाच्या ११व्या श्लोकापासुन प्रत्यक्ष उपदेशाला सुरवात होते. तेथुनच आरंभ समजायला काय हरकत आहे? एक जण तर म्हणाला


 "अक्षरात अकार ही ईश्वरी विभूति भगवंतानी सांगितली आहे. 'अशोच्यानन्वशोचस्तवम्'च्या आरंभी आयातच अकारहि आहे.तेथुनच आरंभ धरावा.ही कोटी सोडून दिली तरी तो आरंभ अनेक प्रकारे योग्य आहे। यात शंका नाही. तरीपन तत्पूर्वीच्या प्रास्ताविक भागांचेही महत्व आहेच. अर्जुन कोणत्या भूमिकेवर आहे,कोणती गोष्ट सांगन्यासाठी गीतेची निर्मिती झाली आहे, हे हा प्रास्ताविक कथाभाग नसता तर लक्षात येते ना.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ३

गीता प्रवचने अध्याय १ / ३

     एवढे महाभारत व्यासांनी लिहिले,पण व्यासांना स्वतःचे असे काही सांगावयाचे होते की नाही? त्यांचा विशिष्ट संदेश त्यांनी कोठे सांगितला आहे का? कोणत्या ठिकाणी व्यासांची समाधि लागली आहे? ठिकठिकाणी अनेक तत्वज्ञानांची आणि उपदेशांची जंगलेच्या जंगले महाभारतात आली आहेत.पण तत्वज्ञानांचे, उपदेशांचे आणि एकंदर सारभुत रहस्य त्यांनी कोठे मांडले का? होय,सम्रग महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गगीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि मननाची संपूर्ण साठवन आहे.हिच्याच् आधारे मुनीत 'मुनि मी व्यास'ही विभूति सार्थ ठरावयाची आहे.प्राचीन काळापासून गीतेला 'उपनिषद'ही पदवी मिळाली आहे.गीता उपनिषदांचेहि उपनिषद आहे. कारण सर्व उपनिषदांचे दोहन करुण हे गीतारूपी दूध भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने जगताला दिले आहे.जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायःप्रत्येक विचार गीतेत येवून गेला आहे.म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे असे अनुभवी पुरुषांनी म्हटले आहे. गीता हा लहानसाच पण हिंदुधर्माचा मुख्य ग्रंथ आहे.


    गीता श्रीकृष्णाने सांगितली हे तर सर्वाना माहित आहे.ही थोर शिकवण ऐकणारा भक्त अर्जुन ह्या शिकवणीशी इतका समरस झाला, की त्यालाही 'कृष्ण' संज्ञा प्राप्त झाली. देवा-भक्तांचे हे हृदगत प्रगट करीत असता व्यासदेव इतके विरघळुुन गेले की त्यानाही लोक 'कृष्ण' ह्याच नावाने ओळखु लागले. सांगणारा कृष्ण,ऐकनारा कृष्ण,रचनारा कृष्ण असे तिघांत जणू अद्वैत उत्पन्न झाले.तिघांची जणू समाधि लागली. गीतेच्या अभ्यासकाला अशीच एकाग्रता पाहिजे.

 क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव