गीता प्रवचने अध्याय १ / ८
गीतेचे प्रयोजन:स्वधर्मविरोधी मोहाचा निरास
अर्जुन अहिंसेचिच काय,पण संन्यासाचीहि भाषा बोलू लागला होता. ह्या रक्तलांछित क्षात्रधर्मापेक्षा संन्यास बरा असे अर्जुन म्हणतो. पण अर्जुनाचा तो स्वधर्म होता का? ती त्याची वृत्ति होती का? अर्जुनाला संन्याशाचा वेष सहज घेता आला असता; पण संन्याशाची वृत्ति कशी घेता आली असती? संन्यासाच्या नावाने जर तो रानात जाऊन राहता तर तेथे तो हरणें मारू लागला असता. भगवान स्पष्टच म्हणाले, अर्जुना,अरे लढाई करणार नाही म्हणतोस, तो तुझा भ्रम आहे.तुझा आजपर्यंतचा बनलेला स्वभाव तुला लढायला लावल्याशिवाय राहणार नाही."
अर्जुनाला स्वधर्म विगुण वाटू लागतो; पण स्वधर्म कितिही विगुण असला तरी त्यात राहूनच माणसाने आपला विकास करुण घेतला पाहिजे. कारण त्यात राहूनच विकास होवु शकतो. ह्यात अभिमानाचा प्रश्न नाही. हे विकासाचे सूत्र आहे. स्वधर्म मोठा म्हणून घ्यायचा नसतो आणि लहान म्हणून टाकायचा नसतो. वस्तुतः तो मोठाहि नसतो,आणि लहानहि नसतो.तो माझ्या बेताचा असतो.
'श्रेयान् स्वधर्मो विगुणः'
ह्या गीतावचनातील 'धर्म' शब्दाचा अर्थ हिंदु धर्म,मुसलमानी धर्म,ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही. प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. माझ्यासमोर असलेल्या दोनशे लोकांचे दोनशे धर्म आहेत. माझाहि धर्म दहावर्षापुर्वी होता तो आज नाही. आजचा दहा वर्षानंतर टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ति पालटत जाते तसतसा पूर्विचा धर्म गळत जातो आणि नविन धर्म लाभत असतो.हट्टाने काहीच करावयाचे नसते.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई

No comments:
Post a Comment