˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 23 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / ७

 गीता प्रवचने अध्याय १ / ७
       मला ह्या ठिकाणी एका न्यायाधीशाची गोष्ट आठवते. एक न्यायाधीश होता.शेकड़ो अपराध्याना त्याने फाशीची शिक्षा दिली होती. परंतु ऐके दिवशी त्याचा स्वतःचा मुलगा खुनी म्हणून त्याच्यासमोर उभा करण्यात आला. त्याच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची न्यायाधीशावर पाळी आली. पण तसे करताना तो न्यायाधीश कचरला. तो आता बुद्धिवाद बोलू लागला,

 "फाशीची शिक्षा अमानुष आहे. ती देणे मनुष्याला शोभत नाही. मनुष्याला सुधारण्याची आशा त्यामुळे नष्ट होते. खून करणाऱ्याने भावनेच्या भरात खून केला. परंतु त्याच्या डोळ्यावरचा खून उतरल्यावर त्या माणसाला गंभीरपणे उचलून फ़ासावर लटकवून मारावयाचे हे समाजाच्या माणुसकिला लाजिरवाने व् काळिमा फासणारे आहे," 
         वगैरे मुद्दे तो न्यायाधीश मांडू लागला.तो मुलगा समोर न येता तर मरेपर्यंत न्यायाधीशसाहेब खुशाल फाशीची शिक्षा देत राहिले असते. मुलाबद्दलच्या ममत्वामुळे न्यायाधीश असे बोलू लागला. ते बोलणे आतंरिक नव्हते. ते आसक्तिजन्य होते. 'हा माझा मुलगा' ह्या ममत्वातुन निर्माण झालेले ते वाड्मय होते.
      अर्जुनाची ह्या न्यायाधीशासारखी गत झाली. त्याने मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते. गेल्या महायुद्धाचे नेमके हेच परिणाम जगाने पाहिले.पण विचाराची गोष्ट इतकीच की अर्जुनाचे ते तत्वज्ञान नव्हते,तो त्याचा प्रज्ञावाद होता. कृष्ण हे जाणून होता. म्हणून त्या मुद्याची मुळीच दखल न घेता त्याने मोहनाशाचा उपाय अवलंबिला. अर्जुन जर खरोखर अहिंसावादी झालेला असता तर अवांतर ज्ञान-विज्ञाने कोणी कितीही सांगितली तरी मूळ मुद्यान्चे उत्तर मिळाल्याशिवाय त्याचे समाधान झाले नसते. पण सबंध गीतेत ह्या मुद्याचे उत्तर नाही आणि अर्जुनाचे समाधान झालेले आहे.ह्या सर्वांचा भावार्थ इतकाच की अर्जुनाची अहिंसावृत्ति नव्हती,तो युद्ध-प्रवृत्तच होता.युद्ध त्याच्या दृष्टीने त्याचे स्वभाव प्राप्त आणी अपरिहार्य ठरलेले कर्तव्य होते.ते कर्तव्य आता तो मोहाने टाळू पाहत होता. आणि गीतेची ह्या मोहावरच मुख्य गदा आहे. 
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

No comments:

Post a Comment