˙˙जय मुक्ताई ..

Friday, 21 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / १

गीता प्रवचने अध्याय १ / १

अध्याय पहिला प्रास्ताविक आख्यायिका
अर्जुनाचा विषाद
१) मध्ये महाभारतम्
   प्रिय बंधुनो!आजपासून आपण मी श्रीमद्भगवतगीतेविषयी सांगणार आहे. गीतेचा व् माझा संबध तर्कापलिकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले,त्याहिपेक्षा माझे हृदय व् बुद्धि यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. जिव्हाळयाचा जेथे संबध असतो तेथे तर्कास वाव नसतो. तर्काला छाटून श्रद्धा व् प्रयोग या दोन पंखानीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो. मी प्रायःगीतेच्याच् वातावरणात असतो.गीता म्हणजे माझे प्राण-तत्व. मी गीतेविषयी इतरांशी बोलतो तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो,आणि एकटा असतो त्या वेळेस त्या अमृतसमुद्रात खोल बुडी मारुन बसतो. अशा या गीता माऊलीचे चरित्र मी सांगावे असे ठरविण्यात आले आहे.

     गीतेची योजना महाभारतात केलेली आहे. गीता महाभारताच्या मध्यभागी सर्व महाभारतावर प्रकाश पाडित उंच दीपाप्रमाणे उभी आहे. एकीकडे सहा पर्वे, दुसरीकडे बारा पर्वे अशा मध्यभागी, तसेच एकीकडे सात अक्षौहिणी सैन्य, दुसरीकडे अकरा अक्षौहिणी, अशा मध्यभागी गीता उपदेशिली जात आहे.
क्रमशः (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
 जय मुक्ताई 
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

No comments:

Post a Comment