गीता प्रवचने अध्याय १ / २
महाभारत व रामायण हे आमचे राष्ट्रीय ग्रंथ आहेत. त्यातील व्यक्ति आमच्या जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. राम,सीता,धर्म,दौप्रदी ,भीष्म,हनुमान इत्यादी रामायण महाभारतातील चरित्रांनी सर्व भारतीय जीवन आज हजारो वर्षे व्यापुन टाकले आहे. जगातील इतर महाकाव्यातील पात्रे अशी लोक जीवनात मिसळून गेलेली दिसत नाहीत. ह्या दृष्टीने महाभारत आणि रामायण हे नि:संशय अदभुत ग्रंथ आहेत.रामायण हे मधुर नितिकाव्य आहे तर महाभारत हे व्यापक समाजशास्त्र आहे.व्यसानी एक लक्ष संहिता लिहून असंख्य चित्रे,चरित्रे व चारित्रे मोठ्या कौशल्याने यथावत रेखाटली आहेत.
केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही पण तसेच ह्या जगात दोषपूर्ण असेही काही नाही, ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगत आहे.भीष्म-युधिष्ठीर अशासारख्यांचे येथे दोष दाखविले आहेत. उलट कर्ण-दुर्योधनादिकांचेहि गुण प्रगट केले आहेत.मानवी जीवन हे पांढऱ्या व काळ्या तंतुचा पट आहे ही गोष्ट महाभारत सांगत आहे. अलिप्त राहून भगवान व्यास जगातील विराट् संसाराचे छायाप्रकाशमय चित्र दाखवित आहेत. व्यासांच्या ह्या अत्यंत अलिप्त व उदात्त ग्रथन कौश्यल्यामुळे महाभारत ग्रंथ म्हणजे एक सोन्याची प्रचंड खाण बनला आहे. शोधन करुण भरपूर सोने लुटून घ्यावे.
क्रमशः (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव

No comments:
Post a Comment